पत्रकार आणि वैज्ञानिक यांच्या सहयोगाने लिहिल्या गेलेल्या या मनोरंजक पुस्तकामध्ये अंतराळयानाच्या इतिहासाचे वर्णन करण्यात आले आहे. अंतराळयानाची रचना व त्याच्या उड्डाणा- व्यतिरिक्त अवकाशामध्ये केल्या जाणाऱ्या विविध भौतिकशा- स्त्रीय, रसायनशास्त्रीय, खगोलशास्त्रीय, जीवशास्त्रीय व इतर प्रयोगांची माहिती आपणाला या पुस्तकामध्ये आढळेल. भारतीय अंतरिक्ष विज्ञानाच्या विकासाचे आणि भारत-सोविएत संयुक्त अंतराळ उड्डाणाचे सविस्तर वर्णनही सदर पुस्तकामध्ये करण्यात आले आहे.
“अंतराळयानाचा प्रवास ” हे पुस्तक मराठी व इतर भारतीय भाषांत भारतीय वाचकांसाठी प्रसिद्ध केले जात आहे या गोष्टीचा आम्हाला खरोखरच आनंद होत आहे हे पुस्तक वाचून वाचकांच्या मनामध्ये अंतरिक्ष विज्ञानाविषयी आवड निर्माण होईल व भारत- सोविएत संयुक्त अंतराळ उड्डाणाच्या अनेक अंगाची त्यांना पुरेपूर माहिती प्राप्त होईल अशी आम्हाला आशा वाटते . सर्व भारतीय वाचकांना शुभेच्छा !
यू. कलेसनिकोव्ह हे पत्रकार असून त्यांचा जन्म १९३५ माली झाला. त्यांनी मॉस्कोच्या ऊर्जाशास्त्र विज्ञान मंस्थेमध्ये शिक्षण घेतले आहे. अंतरिक्ष विज्ञान, जीवशास्त्र इतिहाम इ. वि- षयांवर त्यांचे अनेक लेख मोविएत वृत्तपत्रांमधून आणि मामिकांमधून प्रमिन्द्ध झाले आहेत शक्ती आहे”. जान विज्ञान आणि जीवन ” या लोकप्रिय मामिकांमधून मध्या नियमितपणे त्यांचे वैज्ञानिक लेख प्रसिद्ध होत आहेत.
यूरी ग्लास´कोव्ह हे सोविएत संघाचे वैमानिक-अंतराळवीर आहेत त्यांचा जन्म १९३३ मध्ये झाला. खारकोव येथील हवाईदल प्रशिक्षण केंद्रामधून त्यांनी उच्च शिक्षण प्राप्त केले असून “सोविएत संघाचे वीर” हा बहुमान त्यांनी प्राप्त केला आहे. १९६५ मध्ये अंतराळवीर म्हणून त्यांची निवड झाली. १७७ मध्ये अंतराळउड्डाणात यान अभियंता म्हणून त्यांनी “सयूज-२४” व “सल्युत-५” वर अवकाश यात्रा केली मध्या महत्त्वपूर्ण अंतरिक्ष अन्वेषणात मक्रिय महभाग घेत आहेत.
भाषांतर: रवींद्र रसाळ
You can get the book here and here
अनुक्रमणिका
अग्निबाणातून अवकाशात भरारी 7
कक्षेमध्ये अंतराळयान 29
सहकार्याच्या वाटेने 81
‘सयूज ‘-‘ अपोलो’ : अवकाशामध्ये हस्तांदोलन 99
अंतरिक्षविज्ञान क्षेत्रामधील भारताची प्रगती 113
कक्षेमध्ये यांत्रिकमानव 121
मानवाकडून चंद्राचे अन्वेषण 138
मंगळावर पाहुणे 154
शुक्र ग्रहावर चाल 170
धूमकेतूच्या दिशेने 187
सोविएत-भारत संयुक्त अंतराळ उड्डाण 207
