या पुस्तकात काही दुर्मिळ धातूंबद्दल (लेश मूलद्रव्यांसह) माहिती आहे, आणि प्रस्तुत लेखकाच्या “धातूंच्या नवलकथा” (मराठी भाषेत १९८७ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ) या पुस्तकाचा हा दुसरा भाग आहे असे मानण्यास हरकत नाही. लेखकाने या पुस्तकात सुद्धा पूर्वीच्याच शैलीचा वापर केला आहे : प्रत्येक रासायनिक मूलद्रव्याबाबत सखोल माहिती देण्याऐवजी दुर्मिळ धातूंसंबंधी मनोरंजक माहिती, उत्सुकतापूर्ण घटना, धातूंच्या या अद्भुतरम्य दुनियेतील महत्त्वाच्या शास्त्रीय शोधाचे काटेरी व अजूनही अनोळखी असलेले मार्ग यांचा ऊहापोह केला आहे. पुस्तकामध्ये अनेक खऱ्या व काल्पनिक पात्रांचा समावेश करण्यात आला आहे. अनेक नामवंत शास्त्रज्ञांसह नेपोलिअन, अगाथा ख्रिस्ती, कॅरेल कॅपेक आणि शेरलॉक होम्स यांचा अप्रत्यक्ष उल्लेख येथे केलेला आहे. या व्यक्तींशी निगडित असलेल्या कथानकांच्या पार्श्वभूमीवर लेखकाने, भौतिकशास्त्र, रसायन- शास्त्र आणि धातू-विज्ञानातील यशोगाथा, धातू आणि उपकरणे व साधने तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या नवीन पद्धतींच्या विकासाची वाटचाल यांची ओळख करून दिली आहे. सल्युत-६ कक्षात्मक-अंतरिक्ष स्थानकामध्ये अवकाश-पदार्थ-विज्ञानासंबंधी नुकतेच काही प्रयोग करण्यात आले, त्यांचा उल्लेख सुद्धा या पुस्तकात आहे. वैज्ञानिक साहित्यामुळे प्रभावित होऊन अनेक शास्त्रज्ञ व अभियंते विज्ञान आणि अभियांत्रिकीच्या सर्वोच्च शिखराकडे जाणाऱ्या मार्गावर पहिले पाऊल ठेवतात. आजच्या तरुण पीढीला त्यांचा भविष्यकाल घडविण्याकरता हे पुस्तक उत्तेजन देईल असा माझा दृढ विश्वास आहे.
अनुवाद-राजेंद्र सहस्रबुद्धे
You can get the book here and here
पुस्तकासंबंधी थोडेसे ६
महान नियमाचा विजय (गॅलिअम ) ८
दुष्ट राक्षस (रुबीडिअम ) १९
बंगाली धर्मगुरूंचे गुपित (स्ट्राँशिअम ) २८
जुन्या खाणीतील शोध (इट्रिअम) ३७
डाइनॉसॉरचे पुनरुत्थान (टेक्नेशिअम) ४७
इंग्रज शास्त्रज्ञाचा विनोद (पॅलॅडिअम) ५७
फोनिशिआतील कॅडमसच्या स्मरणार्थ (कॅडमिअम) ६६
अद्भुत दुनियेशी जवळीक (इंडिअम ) ७८
स्क्टालहसन मठातील वास्तव्य (अँटिमनी) ८५
निळ्या रंगाचे दोन अपरिचित (सिशिअम) ९५
बोलोग्नाच्या चांभाराचे सुदैव (बेरिअम ) १०५
केवळ नाममात्र (हाफ्निअम ) ११६
कचऱ्याच्या ढीगाचे गुपित (हेनिअम ) १२५
राजस धातूचा अपमान (ऑस्मिअम ) १३४
इंद्रधनुष्यातील रंग (इरिडिअम ) १४२
उमलणारा अंकुर (थैलिअम ) १५१
अवकाश मोहीम (बिस्मथ) १५९
दुर्मिळातील दुर्मिळ (फ्रान्सिअम) १७१
अक्षय्य किरण (रेडिअम ) १८०
