या पोस्टमध्ये आपण मि. इल्यिन चे माणूस महाबलाढ्य कसा बनला हे पुस्तक पाहू.
या पुस्तकाबद्दल
माणूस – महाबलाढ्य पृथ्वीवर एक महाबलाढ्य आहे. त्याचे हात असे आहेत, जे सहजपणे आगगाडीचे वाफेचे इंजिन उचलतात. त्याचे पाय असे आहेत, की एका दिवसात तो हजारो किलो- मीटर धावू शकतो. त्याचे पंख असे आहेत, की सर्व पक्ष्यांपेक्षा अधिक उंचावर, ढगांवरून तो उडू शकतो. त्याचे कल्ले असे आहेत, की सर्व माशांपेक्षा अधिक चांगल्या रीतीने तो पाण्याखालून पोहू शकतो. त्याचे डोळे असे आहेत, जे अदृश्य गोष्टी पाहू शकतात आणि असे कान आहेत, जे जगाच्या दुसऱ्या टोकाचे बोलणे ऐकू शकतात . तो एवढा ताकदवान आहे, की डोंगरांना बोगदे पाडू शकतो आणि धबधब्यांना हवेतच अडवू शकतो स्वतःच्या इच्छेनुसार तो जगाची फेररचना करतोय, जंगलांची लागवड करतोय, समुद्रांना जोडतोय, वाळवंटांमध्ये पाणी आणतोय. कोण आहे हा महाबलाढय ? हा महाबलाढ्य माणूस ! – माणूस महाबलाढ्य कसा ठरला, पृथ्वीचा मालक कसा बनला ? आमच्या पुस्तकात आम्ही ह्याबद्दलची हकीकत सांगणार आहोत.
अनुवाद – अनिल हवालदार
चित्र – यू. कोलपलोव
हे पुस्तक उपलब्ध करून दिल्याबद्दल मराठी विज्ञान परिषदेचे अनेक आभार
स्कॅनमध्ये मदत केल्याबद्दल विक्रम यांचे आभार.
हे पुस्तक रादुगा प्रकाशकांनी प्रकाशित केले होते.
आपण पुस्तक येथे मिळवू शकता.
इंटरनेट आर्काइव्हवर आम्हाला फॉलो करा: https://archive.org/details/@mirtitles
ट्विटरवर आम्हाला फॉलो करा: https://twitter.com/MirTitles
आम्हाला लिहा: mirtitles@gmail.com
Gitlab : https://gitlab.com/mirtitles/ येथे सविस्तर पुस्तक कॅटलॉगमध्ये नवीन नोंदी जोडा.
